Sun, Feb 28, 2021 05:45
सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांचा राजीनामा

Last Updated: Jan 25 2021 2:59PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा 

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला. भाजप   प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या आदेशानुसार गटनेतेपदाचा बावडेकर यांनी राजीनामा दिला. 

आठ फेब्रुवारीला विद्यमान महापौरांची मुदत संपते. महापौर बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या  आहेत. त्यानंतर खुल्या वर्गातील अडीच वर्षाच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपचे बावडेकर, धीरज सूर्यवंशी निरंजन आवटी आदी इच्छुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी-काँग्रेस  आघाडीकडून विरोधी पक्षनेते  उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण,  मनोज सरगर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान आदी  इच्छुक आहेत. फुटीचा धोका टाळण्यासाठी  येत्या १५ फेब्रुवारीपूर्वी भाजपकडून नवीन गटनेते निवडून महापौर पदासाठी सुरक्षित खेळी सुरू झाल्या आहेत.