Wed, Aug 12, 2020 09:22होमपेज › Sangli › दिलासादायक! सांगलीतील ‘त्या’ २८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

दिलासादायक! सांगलीतील ‘त्या’ २८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Last Updated: Apr 28 2020 9:11AM

संग्रहित छायाचित्रइस्लामपूर (जि. सांगली) : पुढारी वृत्तसेवा 

वाळवा तालुक्यातील २८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. ज्या रिपोर्टकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते ते रिपोर्ट सोमवारी (दि. २८) रात्री उशिरा प्राप्त झाले.

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कामास असलेल्या कामेरी व कासेगाव येथील दोघांना कोरोना झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली होती. प्रशासनाने कामेरीमधील रुग्णाच्या कुटुंबातील ‍१५, कासेगातील ९, येडेनिपाणी व बावची येथील प्रत्येकी एक अशा एकून २८ जणांना इस्लामपूर येथे तातडीने संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. 

त्यांचे स्वॅब रविवारी (दि. २६) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा हे अहवाल प्राप्त झाले. यात सर्व २८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. यामुळे तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग थांबणार असल्याचे चित्र आहे.