सांगली : पुढारी वृत्तसेवा
मुळात कोरोना हा रोग नाही. तो मानसिक आजार आहे. कोरोनामुळे जी माणस मरतात ती जगण्याच्या लायक नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले आहे.
समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दुशासन होता कामा नये. निव्वळ मूर्खपणा सुरू आहे. शासनाचे घातकी निर्णय आहेत. अनेकांचे संसार आणि व्यापार माती मोल होत आहेत. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे.
ते म्हणाले, लॉकडाऊनमध्ये खासदार, आमदार यांचे पगार सुरू आहेत. शासनाने त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे आता लोकांनी बंड करून उठलं पाहिजे.
अधिक वाचा : कोरोनाची परिस्थिती गंभीर; धैर्याने सामोरे जावू; शरद पवार यांनी केले आवाहन
सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत. असलं सरकार फेकून दिलं पाहिजे. तसेच हे सरकार दारू दुकाने उघडी ठेऊन सामान्य भाजी विक्रेत्यांवर मात्र लाठ्या मारत आहे, असा आरोप संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केला आहे.
अधिक वाचा : ‘ट्रकभर पुरावे’, ‘पाठीत खंजीर’ ते... शरद पवारांवरील आरोपांचे पुढे काय झाले?