Thu, Jun 24, 2021 10:37होमपेज › Sangli › पुढारी शॉपिंग फूड फेस्टिव्हलची तयारी पूर्ण

पुढारी शॉपिंग फूड फेस्टिव्हलची तयारी पूर्ण

Last Updated: Dec 05 2019 1:34AM
सांगली : प्रतिनिधी
चविष्ट, चमचमीत खाद्यपदार्थांसोबत दर्जेदार कंपन्यांची उत्पादने आणि भरघोस सवलती देणार्‍या पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलला गुरुवारपासून येथे सुरूवात होत आहे. दि.5 ते 9 डिसेंबर दरम्यान येथील कल्पद्रूम ग्राऊंड नेमिनाथनगर येथे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.  या कार्यक्रमाचे सहप्रायोजक रोनिक वॉटर हिटर व आईस्क्रिम पार्टनर क्रेझी आईस्क्रिम (सांगली) हे आहेत. 

गुरुवारी (दि.5) सकाळी 10 वाजल्यापासून  हे   प्रदर्शन  सर्वांसाठी खुले असेल. पाच दिवस सुरू राहणार्‍या या प्रदर्शनात रुचकर व लज्जतदार पदार्थांची चव चाखण्याबरोबर मनसोक्त खरेदी आणि सवलतींचा लाभ घेता येणार आहे. या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे.  अ‍ॅम्युजमेंट पार्कची धम्माल तसेच दररोज झकास मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. 

खवय्यांसाठी भरपूर काही.. प्रदर्शनात शाकाहारी पदार्थांबरोबर गृहोपयोगी वस्तूंचे शंभरापेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत. पिझ्झा, दम मटका मिसळ आणि बिर्याणीचाही आस्वाद घेता येणार आहे.

डोसा, उत्ताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, झुणका-भाकर, व्हेज पुलाव,  मटका मिसळ, आईस्क्रिम अशा पदार्थांचे स्टॉलही फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत. 
महिला, तरुणींसाठी सर्व काही...

महिला व तरुणींसाठी क्रोकरी, सौंदर्यप्रसाधने, फॅन्सी ड्रेस, तरुणांसाठी व्यायामाचे साहित्य, तर ज्येष्ठांसाठी आयुर्वेदिक प्रॉडक्ट, कपडे आदी बरेच काही फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत. 

गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली
गृहोपयोगी वस्तू लोकांना एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, लोणची, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमिटेशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाल्याचे  व दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू यांचे स्टॉल असतील.

गृहोपयोगी स्टॉल बुकिंगसाठी  परितोष 9766213003, तसेच फूड स्टॉलसाठी तनईम 9325477714 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
नामवंत कलाकारांसोबत हितगूज करण्याची संधी

कलर्स मराठीवरील नामवंत कलाकारांना भेटण्याची तसेच त्यांच्याशी हितगूज  साधण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. तसेच कलाकरांचा कलाविष्कार या प्रदर्शनामध्ये पाहवयास मिळणार आहे. झुम्बा डान्स, हिंदी-मराठी गाणी तसेच कथक नृत्य, भरतनाट्य असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  म्युझिकल मस्ती आणि फनी गेम्स खेळ असणार आहेत.  

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतील अशोक फळदेसाई म्हणजेच आपला सर्वांचा लाडका ‘शिवा’ सोबत शर्वरी जोग म्हणजेच सर्वांची लाडकी ‘सोनी’ या कलाकरांशी गप्पा मारण्याची संधी.