Mon, Apr 06, 2020 09:43होमपेज › Sangli › आष्टा येथे होम मिनीस्टरचे आयोजन

आष्टा येथे होम मिनीस्टरचे आयोजन

Last Updated: Feb 27 2020 2:39AM
कोल्हापूर  : पुढारी वृत्तसेवा 
दै. पुढारी कस्तुरी क्लब नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. यातीलच एक भाग म्हणून आष्टा येथे सभासदांसाठी होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम रविवार दि. 1 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम हॉल, गोरडे चौक, मेन रोड आष्टा येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून श्री गणेश वस्त्र निकेतन हे लाभले आहे. यांच्याकडून होम मिनीस्टर या स्पर्धेसाठी मानाची पैठणी तसेच गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक साड्या देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राधेशाम ज्वेलर्स यांच्याकडून होम मिनीस्टर या स्पर्धेतील उपविजेत्यांना 5 सोन्याच्या नथी देण्यात येणार आहेत. होम मिनिस्टर हा कार्यक्रम मोनिका करंदीकर या घेणार आहेत. या कार्यक्रमामध्ये गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न होणार असून स्पर्धकांनी उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क कस्तुरी संयोजिका मंगल देसावळे 8830604322, प्रणोती पवार 7447448596, माधुरी पाटील 7385166001, स्वाती सुर्यवंशी 9960970613, मंजुश्री महामुनी 8888496828.
लकी ड्रॉ :

या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांमधून 10 लकी विजेत्या महिलांना सुवर्णस्पर्श यांच्याकडून 10 गोल्ड प्लेटेड ठुशी देण्यात येणार आहे.