Sun, Aug 09, 2020 12:00होमपेज › Sangli › सरकारने दूध आंदोलन दडपण्याचा नाद सोडावा

सरकारने दूध आंदोलन दडपण्याचा नाद सोडावा

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 16 2018 12:25AMसांगली : प्रतिनिधी

शासनाने दूध आंदोलन दडपण्याचा नाद सोडावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिला. शासनाने दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यांवर लिटरमागे पाच रुपये अनुदान जमा केलेच पाहिजे. तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले. 

मुंबईवर दूध आंदोलनाचा परिणाम होणार नसल्याचे महसूलमंत्री बोलत आहेत. याबद्दल विचारता ते म्हणाले, दूध कमी न पडायला त्यांच्याकडे कृत्रिम दूध उत्पादन करण्याच्या कंपन्या आहेत का? असा सवाल त्यांनी केला. 

ते म्हणाले, दूध उत्पादकाला प्रतिलिटर 35 रूपये उत्पादन खर्च येतो. मात्र दुधाला 18 रूपये भाव मिळतो. शेतकर्‍याला हे न परवडणारे नाही. शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. पाण्याची बाटली वीस रूपयाला मिळते मग दुधाला भाव का मिळत नाही? शासनाने लिटरला पाच रूपये अनुदान देवून थेट खात्यावर जमा करणे आवश्यक आहे. यासाठी दूध उत्पादकांनी सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपूर येथे विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून मध्यरात्री आंदोलनाला सुरवात होत आहे. दूध आंदोलन हे ग्राहकाविरोधात नाही. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत दूध विकणार नाही.

पोलिसांनी आंदोलन मोडीत काढण्यासाठी कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. अन्यथा शेतकरी आक्रमक झाला तर मागे हटणार नाही. दूध आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर टाकू नये. गोरगरिब जनतेला द्यावे, वारकर्‍यांना, झोपडपट्टीतील नागरिकांना, शाळेतील मुलांना, अनाथ आश्रमात द्यावे. त्याची नासाडी करू नये, असे आवाहन खा.शेट्टी यांनी केले.