Sun, Aug 09, 2020 12:06होमपेज › Sangli › महाआघाडी २८ जागा जिंकेल : जयंत पाटील

महाआघाडी २८ जागा जिंकेल : जयंत पाटील

Published On: Apr 24 2019 1:41AM | Last Updated: Apr 23 2019 11:15PM
इस्लामपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी साखराळे (ता. वाळवा) येथे सहकुटूंब मतदान केले. राज्यातील एकूण 48 जागांपैकी  28 ते 30 जागा महाआघाडी जिंकेल, असे आमदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी महाआघाडीस राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. महाआघाडी या निवडणुकीत चांगला स्कोअर करेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

आमदार पाटील सकाळी 9 वाजता बौद्ध मंदीर येथील मतदान केंद्रावर आले. त्यांच्या समवेत  पत्नी सौ. शैलजादेवी पाटील, चिरंजीव प्रतिक पाटील व राजवर्धन  होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी,  प्रल्हाद सुर्वे, प्रशांत पाटील त्यांच्यासोबत होते. पाटील म्हणाले,  आज झालेल्या मतदानात महाआघाडीलाच लोकांची पसंती आहे. त्यामुळेच लोकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. मी  संपूर्ण राज्यात जाऊन आलो आहे. पुढच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्‍वभूमीवरही जाणार आहे.