Mon, Sep 23, 2019 04:02होमपेज › Sangli › जत : वैरण आणण्यास गेलेल्‍या शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

जत : वैरण आणण्यास गेलेल्‍या शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

Published On: Sep 12 2019 10:32AM | Last Updated: Sep 12 2019 10:21AM

संतोष मुडगोळजत: शहर प्रतिनिधी     

बिळूर (ता. जत ) येथे शेतात वैरण आणण्यास गेलेल्या तरुण शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संतोष आण्णाप्पा मुडगोळ (वय. 29) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

याबाबत जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत बिळूर रस्त्यावर मुडगोल यांची वस्ती आहे, संतोष मुडगोळ हा तरुण बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या  शेतात जनावरांसाठी मक्याचा चारा आणण्यासाठी गेला होता. तीन तास झाले तरी मुलगा घरी आला नाही म्हणून वडील आण्णाप्पा हे शेतात गेले. त्यावेळी संतोष मका पिकात मृत अवस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून डॉक्टरानाही दाखवले होते. त्यानंतर या घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली.  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत संतोषचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

 याप्रकरणी मयत संतोषचे वडील अण्णाप्पा मुडगोळ यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, ही घटना घडताच बिळूरात तरुणाचा खून अशी अफवा  उठली होती. परुंतु संतोषच्‍या वडिलांच्‍यांकडून मुलाचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत बिळूर परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.