Sun, Sep 20, 2020 06:12होमपेज › Sangli › शिराळा नगरपंचायतीसह उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव

शिराळा नगरपंचायतीसह उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव

Last Updated: Aug 14 2020 1:12AM

संग्रहीत छायाचित्रशिराळा : पुढारी वृतसेवा 

शिराळा नगर पंचायत व उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला असून तालुक्यात ८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील शहरात शिंदे गल्ली १, प्रोफेसर कॉलनी २, नगरपंचायत १ असे एकुण मिळून ४ कोरोना बाधित व्यक्ती आज आढळून आल्याने शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत शिराळा तालुक्यामध्ये २३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात ५२ लोकांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 

येथील नगरपंचायत मधील २७ वर्षीय अधिकाऱ्याला तर उपजिल्हा रुग्णालयातील ४२ वर्षांची परिचारिका आणि तिच्या ४५ वर्षीय पती त्याचबरोबर शिंदे गल्ली येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या चारही ठिकाणी तहसिलदार गणेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पाटील, नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष किर्तिकुमार पाटील, बांधकाम सभापती सुनिता निकम, नगरसेविका सीमा कदम, नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक राजकन्या कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली.

सांगली : तब्बल ५५ कोरोना रुग्णांच्या बिलात घोळ

मांगले २ मांगरूळमध्ये २ तर शिराळा येथे ४ असे एकूण ८ कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आज आढळून आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात २९ रुग्ण दाखल केले असून मिरज येथील शासकीय रुग्णालयात ७ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत तालुक्यातील दोन हजार पेक्षा जास्त लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. शिराळा येथील आयटीआय मध्ये १९ लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवाजीराव देशमुख कॉलेजमध्ये ३६ लोकांना विलगीकरन करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यामध्ये रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाची धावपळ वाढली आहे. आता कोरोनाने तालुक्यामध्ये शासकीय विभागातच शिरकाव केल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील लोक भयभीत झाले आहेत.

 "