Mon, Aug 10, 2020 05:00होमपेज › Sangli › चांदोलीत अतिवृष्टी, धरणाच्या पाणी पातळीत पाऊण मीटरने वाढ 

चांदोलीत अतिवृष्टी, धरणाच्या पाणी पातळीत पाऊण मीटरने वाढ 

Last Updated: Jul 07 2020 7:53PM

संग्रहित छायाचित्रवारणावती : पुढारी वृत्तसेवा 

चांदोली धरण परिसरात आज चौथ्या दिवशी पावसाची संततधार कायम असून, सोमवार सकाळी आठ ते आज मंगळवार  सकाळी आठ वाजेपर्यंत  २४ तासात येथे तब्बल ८२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे चांदोलीत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दुपारपासून मात्र पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ८ तासात ६ मिलिमीटर पावसाची नोंद  झाली आहे .

वाचा :सांगली : मिरजेत कोरोनाचा पहिला बळी 

चांदोली परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही वाहू लागला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पाऊस आणि आज झालेली अतिवृष्टी यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढत होत आहे. गेल्या चोवीस तासात पाऊन मीटरने धरणाची पाणी पातळी वाढली आहे .

धरणाच्या पायथा वीजगृहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग दुपारी चार वाजता  ८०० क्युसेक वरूण ८१५ कयुसेक इतका करण्यात आला आहे. परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाणही अधिक आहे. तर धरणातील पाणीसाठाही अधिक आहे. आज चार वाजता चांदोली धरणाची पाणी पातळी  ६०४.९० मीटर तर पाणीसाठा  १६.०५  टीएमसी इतका होता त्याची टक्केवारी  ४६.६६ इतकी आहे. आज अखेर ६८२ मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे .

वाचा :सांगली:  मार्केट यार्डात उद्यापासून ‘लॉकडाऊन’