Wed, Aug 12, 2020 12:21होमपेज › Sangli › युवक, शेतकर्‍यांत भाजपविरुद्ध प्रचंड नाराजी 

युवक, शेतकर्‍यांत भाजपविरुद्ध प्रचंड नाराजी 

Published On: Apr 13 2019 1:49AM | Last Updated: Apr 12 2019 11:02PM
सांगली : प्रतिनिधी

शेतीमालास भाव  आणि  नोकर्‍या नसल्याचे  शेतकरी व युवकांत भाजपविरुध्द प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे मतदार भाजपला नाकारणार आणि विशाल पाटील यांनाच निवडून देणार यात शंका नाही, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांनी केले. सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडी-स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांचा पलूस तालुका प्रचार दौरा वसगडे येथून  सुरू झाला. त्यावेळी  आयोजित बैठकीत डॉ. कदम बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते अरूणआण्णा लाड, स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, महेंद्र लाड, नेमगोंडा पाटील, अनिल पाटील, अमोल पाटील, महावीर पाटील, सुनील पाटील-डिग्रजे यांच्यासह वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ व सुखवाडीतील ग्रामस्थ,  कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डॉ. कदम म्हणाले,  शेतीमालास हमीभाव मिळत नाही. महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे लोक काँग्रेसलाच मतदान करणार आहेत. चाळीस वर्षे पलूस-कडेगावची जनता काँग्रेसच्या मागे उभी आहे. त्यामुळे येथून उच्चांकी मतदान विशाल पाटील यांना होणार आहे. त्यासाठी आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.  विशाल  हे नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकतील. विशाल पाटील म्हणाले, ज्यावेळी स्वाभिमानीची उमेदवारी घेण्याची वेळ आली तेव्हा,  मी विश्‍वजीत कदम यांना काय करावे, असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘कोणत्याही पक्षातून उभे रहा मी तुमच्या बरोबर आहे’, असा शब्द मला दिला. म्हणून माझ्या यशात त्यांचा मोठा वाटा असेल.  गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून सगळेच एकत्र आले आहेत. कारण अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्वच घटक पक्ष मोठ्या ताकदीने कामाला लागले आहेत. 

बॅटिंगला एक नव्हे दोन गडी असतात

विश्‍वजित कदम यावेळी विशाल पाटील यांना म्हणाले,बँटिंगला एक गडी नसतो तर दोन असतात. भविष्यात जर तुमच्यासारखी आमच्यावर बाजूला थांबायची वेळ आली तर आम्हाला साथ द्या.