Thu, Jul 09, 2020 22:05होमपेज › Sangli › गोपीचंद पडळकर यांची संपत्ती एक कोटी

गोपीचंद पडळकर यांची संपत्ती एक कोटी

Published On: Apr 04 2019 2:02AM | Last Updated: Apr 03 2019 11:20PM
सागंली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची 1 कोटी 2 लाख रुपये संपत्ती आहे. विवरण पत्रात पडळकर यांनी ते शेतकरी असल्याचे लिहिले आहे.  गेल्या काही वर्षांत 60 लाखांची स्थावर मालमत्ता आणि 24 लाख रुपयांची चारचाकी गाडी खरेदी केली आहे. 

पडळकर यांनी 95 हजार रुपयांची रोख रक्कम दाखवली आहे. विविध बँकांत 17 हजार रुपयांची ठेव आहे. त्यांनी 2013 मध्ये चोवीस लाख रुपयाची चारचाकी गाडी खरेदी केली आहे. त्यांच्याकडे साठ हजार रुपयांचे 20 गॅ्रम सोन्याचे दागिने आहेत. पिंपरी बुद्रूक (ता. आटपाडी) येथे दहा लाखांची साडेतीन एकर जमीन, झरे येथे पंचवीस लाखांची 6 एकर शेतजमीन आहे. बिगर शेतजमीन विटा येथे 28  लाख रुपयांची आहे. पडळकरवाडी येथे 3 लाख आणि झरे येथे 7 लाख रुपयांचे घर आहे. पडळकर यांचे शिक्षण बारावी  आहे. ते सध्या शेती करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत आयकर विवरण पत्र भरलेले नाही.