Mon, Aug 10, 2020 05:00होमपेज › Sangli › एकदा संधी द्या जिल्ह्याचा कायापालट करतो

एकदा संधी द्या जिल्ह्याचा कायापालट करतो

Published On: Apr 16 2019 2:21AM | Last Updated: Apr 15 2019 11:13PM
तासगाव : प्रतिनिधी

मी कुणाच्या गुंडगिरीला भीक घालत नाही. ती मोडून काढण्यासाठीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. तालुक्यातील जनतेने भयमुक्त होऊन मतदान करावे. एकदा मला संधी द्या, जिल्ह्याचा कायापालट करुन दाखवतो, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केले. सावळज ( ता. तासगाव)  येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

पडळकर म्हणाले, आता जमाना बदलला आहे. जनता जागी झाली आहे.  ही लोकशाही आहे. भिती  दाखवणे, धमकावणे किंवा केसेसे करतो म्हणून भय दाखवणे असले प्रकार यापुढे चालणार नाहीत. कुणी खपवूनही घेणार नाहीत. आम्ही त्यांच्या गावात जाऊन प्रचार करणार,  त्यांनी माझ्या गावात येऊन प्रचार करावा, मी त्यांचे स्वागत करतो. दादागिरीची भाषा वापरण्याच्या भानगडीत कुणी पडू नये. कायद्याच्या राज्यात अशी भाषा यापुढे कुणी खपवून घेणार नाही.

पडळकर म्हणाले, जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना मंत्रीपद मिळू नये म्हणून कुणी खटपट केली? प्रत्येक ठिकाणी कुणी गटबाजी  सुरू केली. प्रत्येकाला त्यांनी त्रास दिला आहे. म्हणून तर त्यांच्या उमेदवारीला सर्वजण विरोध करीत होते. परंतु मी एकटा  त्यांनाच उमेदवारी द्या म्हणत होतो. कारण ग्राऊंड लेव्हलची परिस्थिती मलाच माहिती आहे. या मतदारसंघात आता वंचित बहुजन आघाडीचेच वारे आहे. नामदेवराव करगणे,  सुकुमार कांबळे, प्रशांत शेजाळ, श्रीरंग कोरे, डॉ. सुदर्शन घेरडे, बाळासाहेब रास्ते, नानासाहेब वाघमारे यांची भाषणे झाली.