Wed, Aug 12, 2020 09:50होमपेज › Sangli › पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर

आता मतदानानंतर लगेच खात्रीही होणार

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 7:53PMसांगली : प्रतिनिधी

पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट (व्होटर्स व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल) या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मशीनवर मतदान केल्यानंतर लगेचच काही सेकंद त्याची स्लीप दिसणार आहे. त्यामुळे आपण नेमके त्याच उमेदवारास मतदान केल्याची खात्री होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच अशा पध्दतीच्या मशीनचा वापर होत आहे. 

मतदान करण्यासाठी पूर्वी कागदी स्लीपचा वापर होत होता. मात्र त्यात गैरप्रकार आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब होत होता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मतदानासाठी आता मशीनचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुलभ आणि निकालात गतिमानता येत आहे. व्हीव्हीएम मशीनव्दारे होणार्‍या मतदानाबाबत शंका उपस्थित होत आहेत. मशीनवर मतदान केल्यानंतर बीप असा असा आवाज येतो.

मात्र नेमके त्याच उमेदवाराला मतदान झाले का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मतदान एकाला केल्यानंतर मत दुसर्‍याच उमेदवाराला गेले, असे काही किस्से पुढे आले आहेत. अनेक राज्यात झालेल्या निवडणुकीत असा प्रकार झाल्याच्या चर्चा झाल्या. मशीनच्या वापराबाबत काहींनी न्यायालयातही धाव घेतली. त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. मतदानात पारदर्शकता येण्यासाठी स्लीपचा पर्याय करण्यात आला आहे. मात्र ही स्लीप केवळ मतदारांना मशीनवर काही काळ दिसणार आहे, तशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.