Mon, Sep 23, 2019 04:07होमपेज › Sangli › गणेश भक्तांचा मिरजेत पर्यावरण पूरक गणेशोत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश भक्तांचा मिरजेत पर्यावरण पूरक गणेशोत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Sep 12 2019 8:22PM | Last Updated: Sep 12 2019 8:22PM
सांगली : प्रतिनिधी 

सांगली, मिरजेत महापुरामुळे यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिकेने आवाहन आवाहन केले होते. याला मिरजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  

मिरजेत अनंत चतुर्थी दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७४ गणेश मूर्ती दान करण्यात आल्या आहेत.  तसेच सातव्या दिवशी ११८ तर नवव्या दिवशी ३५ गणेश मूर्तींचे दान करण्यात आले आहे. या मोहिमेत महापालिका, मित्रमेळा, नागरिक जागृती मंच, जय गणेश मित्र मंडळ, आभाळमाया यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

तसेच कुंडात विसर्जन केलेल्या मूर्ती अमोनियम बायकार्बोनेट वापरून नैसर्गिक विघटन करण्यात येत आहे.