Fri, Jul 03, 2020 01:30होमपेज › Sangli › कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या

कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या

Last Updated: Jun 07 2020 12:23AM
आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या भीतीने शेटफळे येथील वृद्धाने आत्महत्या केली. या वृद्धाचे नाव दिगंबर कृष्णा खांडेकर (वय 68) आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

शेटफळेत सापडलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णाच्या घरालगत या व्यक्‍तीचे घर आहे. शेटफळे  येथील एसटी चालकाला व त्यानंतर त्याच्या दोन मुलांना कोरोनाची बाधा झाली. शेजारच्या घरातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याने ते धास्तावले होते. दिगंबर कृष्णा खांडेकर यांच्या नातेवाईकाचा कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने स्वॅब घेण्यात आला. या  घडामोडीमुळे ते बैचन झाले होते. मानसिकद‍ृष्ट्या दुर्बल असल्याने  मुलास आणि पत्नीला आपल्याकडे कोरोना झाला असल्याचे सतत सांगत होते.    

गावातील दक्षता समितीचे सदस्य विजय देवकर यांनी आरोग्य सेवक चवरे यांना बोलावून त्यांची तपासणी केली होती. परंतु, शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.