Thu, Jun 04, 2020 00:27होमपेज › Sangli › कोरोनाचा डॉक्टरांनीच घेतला धसका, सांगली जिल्ह्यातील अनेक रुग्णालये बंद

कोरोनाचा डॉक्टरांनीच घेतला धसका, सांगली जिल्ह्यातील अनेक रुग्णालये बंद

Last Updated: Mar 26 2020 4:30PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना विषाणूचा नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांनी सुद्धा धसका घेतलेला आहे. याची आपणाला बाधा होऊ नये यासाठी अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवलेले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. 

अधिक वाचा : सांगली : आरोग्य कर्मचाऱ्याला धमकी, सेविकेला मारहाण

गेल्या आठ दिवसांपासून कोरोना हा विषाणू आणि त्या संदर्भातील चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. हा आजार मोठ्या वेगाने पसरत आहे. त्याशिवाय त्याच्यावर नेमका इलाज सापडलेला नाही. त्यामुळे स्वतः डॉक्टरच हादरलेले आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यात कोरोना आजाराचे नऊ रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. या रुग्णांची संख्या जास्त असेल आणि आपल्या दवाखान्यात असा रुग्ण आला तर करायचे काय असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. त्यामुळे काहींनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत.

अधिक वाचा : कोल्हापूर : लॉकडाऊन काळात घास भरवणारा खाकीतला माणूस 

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची इइपी किट उपलब्ध केले जावे, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. या किटची किंमत साडेतीन हजार रुपये असून ते एकदाच वापरता येते. सध्या अशी किट फारशी उपलब्ध नाही. त्याशिवाय ही किट कोरोना आजार झालेल्या रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात वापरण्यात येत आहे. दरम्यान, अनेक रुग्णालयातील कर्मचारीही गेल्या चार दिवसांपासून कामावर येत नाहीत. त्यामुळेही दवाखाने कसे चालवायचे असा प्रश्न डॉक्टरांच्या समोर आहे. त्याशिवाय अनेक डॉक्टरांची ओपीडी लहान आहे. त्यामध्ये ठराविक अंतर ठेवून रुग्णांना कसे तपासावे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेही काही डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवलेले आहेत.

अधिक वाचा : नुसतेच लॉकडाऊन कामाचे नाही - WHO

दरम्यान प्रशासनाने सर्व डॉक्टरांनी त्यांची सेवा सुरू ठेवावी असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे दवाखाने पूर्ववत सुरू होत असल्याचे दिसत आहे. याबाबत आयएमए संघटनेचे सचिव डॉक्टर नितीन पाटील म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात काही डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता दवाखाने सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. रुग्णांच्यावर उपचार केले जात आहेत. रुग्णांनी दवाखान्यात येतानाच सँनिटायझरने हात धूऊन दवाखान्यात प्रवेश करावा, असे फलक लावण्यास सांगण्यात आलेले आहे. सर्दी आणि खोकला असलेल्यांना मास्क वापरण्याची आवश्यकता आहे. सर्वांनीच मास्क वापरण्याची गरज नाही.

अधिक वाचा : 'डॉक्टर, पोलिसांवरील हल्ला सहन करणार नाही, लष्कर आणण्याची वेळ येऊ देऊ नका'