Fri, Jul 03, 2020 16:40होमपेज › Sangli › उत्सुकता पुढारी शॉपिंग फेस्टिव्हलची

उत्सुकता पुढारी शॉपिंग फेस्टिव्हलची

Last Updated: Dec 01 2019 8:31PM
सांगली : प्रतिनिधी
सांगलीवासीयांना उत्सुकता असलेल्या ‘पुढारी कस्तुरी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला  सांगली येथे दि. 5 ते 9 डिसेंबर दरम्यान येथील कल्पद्रूम ग्राऊंड नेमिनाथनगर येथे  प्रारंभ होत आहे. 

या फेस्टिव्हलमुळे नववर्षाचा आनंद बच्चे कंपनीबरोबर आबालवृद्धांनासुद्धा पुरेपूर लुटता येणार आहे. चमचमीत खाद्यपदार्थांसोबत दर्जेदार कंपन्यांची उत्पादने आणि भरघोस सवलती हे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य आहे.

महिला व तरुणींसाठी क्रॉकरी, सौंदर्यप्रसाधने, फॅन्सी ड्रेस, तरुणांसाठी व्यायामाचे साहित्य, तर ज्येष्ठांसाठी आयुर्वेदिक प्रॉडक्ट, कपडे आदी बरेच काही फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत. 

गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली  कुटुंबासाठी लागणार्‍या गृहोपयोगी वस्तू लोकांना एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. फ्रीज, वॉशिंग मशिन, गॅस शेगडी, लोणची, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमेटिशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाल्याचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू यांचे स्टॉल असतील.

शाकाहारी पदार्थांची मेजवानी
या फूड फेस्टिव्हलमध्ये शाकाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे.  डोसा, उत्ताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, झुणका-भाकर, व्हेज पुलाव, आईस्क्रिम आदी चमचमीत पदार्थांचे स्टॉलही आहेत. गृहोपयोगी स्टॉल बुकिंगसाठी सनी 9765566413  आणि परितोष 9766213003, तसेच फूड स्टॉलसाठी तनईम 9325477714 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.

नामवंत कलाकारांसोबत हितगुज साधण्याची संधी
झी मराठीवरील नामवंत कलाकारांना भेटण्याची तसेच त्यांच्याशी हितगुज  साधण्याची संधी या प्रदर्शनातून वाचकांना मिळणार आहे. तसेच कलाकरांचा कलाविष्कार या प्रदर्शनामध्ये पहावयास मिळणार आहे.