Sun, Sep 20, 2020 06:09होमपेज › Sangli › विट्यात हॉस्पिटलमधील डॉक्टरच कोरोनाबाधित

विट्यात हॉस्पिटलमधील डॉक्टरच कोरोनाबाधित

Last Updated: Aug 07 2020 2:55PM

संग्रहीत छायाचित्रविटा : पुढारी वृत्तसेवा

येथील एका मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह तालुक्यातील अन्य चार जण  कोरोना बाधित झाले आहेत. विटा शहर आणि तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज शुक्रवारी पुन्हा यात पाच जणांची भर पडली. यात विट्यातील एका मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर तसेच नागेवाडी येथील कोरोना बाधित डॉक्टराची पत्नी (वय ४५) आणि मुलगा (वय १९) तसेच भाळवणी येथील ५५ वर्षाचा पुरुष आणि वेजेगाव येथील २० वर्षाचा मुलगा असे एकूण  ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

 

 

 "