Wed, Aug 12, 2020 21:15होमपेज › Sangli › चौकाचौकांत उमेदवारांची ‘कुंडली’

चौकाचौकांत उमेदवारांची ‘कुंडली’

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 30 2018 12:30AMसांगली : प्रतिनिधी

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांच्या सूचनेनुसार महापालिका निवडणूक विभागाने तीनही शहरांतील चौकाचौकांमध्ये उमेदवारांच्या सर्व पार्श्‍वभूमीसह त्यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीच्या गोषवार्‍याचे फलक लावले आहेत. हे फलक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. 

निवडणूक आयुक्‍त सांगली दौर्‍यावर आले असता, त्यांनी सर्व उमेदवारांची  कुंडली जनतेसमोर मांडा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेतर्फे रविवारपासून प्रत्येक चौकात उमेदवारांनी शपथपत्रात नमूद केलेली माहिती प्रभागनिहाय प्रसिद्ध करून त्याचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपासून सांपत्तिक स्थितीपर्यंत सर्व माहिती या फलकांवर देण्यात आली आहे. रविवारी तीनही शहरात ठिकठिकाणी दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. फलक लावलेल्या चौकात या नेत्यांची  भाषणे ऐकतानाच  नागरिक फलकांवरील माहितीही वाचत असल्याचे दृष्य दिसत होते.