Mon, Aug 10, 2020 04:33होमपेज › Sangli › स्वीकृत नगरसेवकपदी चेतन शिंदे

स्वीकृत नगरसेवकपदी चेतन शिंदे

Last Updated: Feb 28 2020 8:18PM
इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी महाडिक गटाचे चेतन शिंदे यांची निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी प्रज्ञा पवार प्रमुख उपस्थित होते.  निवडीनंतर महाडिक गट, विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. 

पालिकेत विकास आघाडीची सत्ता आहे. या आघाडीतील महाडिक गटाचे स्वीकृत नगरसेवक सतीश महाडिक यांनी   राजीनामा दिला होता. या पदासाठी महाडिक युवा शक्तीचे चेतन शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची करण्यात आली.

नगरसेवक अमित ओसवाल, गटनेते विक्रम पाटील, वैभव पवार, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, अक्षय माने, निखिल पेठकर, जमीर शिकलगार, चेतन चव्हाण, सत्यवान रास्कर, इम्रान फकीर, सचिन पवार, सरफराज डाके, महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात उपस्थित होते. 

शिंदे यांनी निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तेथून यल्लामा चौकातील यल्लामा देवीचे दर्शन घेवून गांधी चौक, आझाद चौक, बस स्टॅण्ड ते पेठनाका येथे (स्व.) नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 

पं. स. चे गटनेते राहुल महाडिक, जि. प. चे माजी सदस्य सम्राट महाडिक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल यांनी चेतन शिंदे यांचा सत्कार केला. जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, पेठ ग्रामपंचायत सदस्य अमीर ढगे, शंकर पाटील, पै. बबन शिंदे, जलाल मुल्ला, मन्सूर वाठारकर, इसाक वलांडकर आदी उपस्थित होते.