Tue, Aug 04, 2020 14:08होमपेज › Sangli › सांगली : चांदोली धरण ४१ टक्के भरले 

सांगली : चांदोली धरण ४१ टक्के भरले 

Last Updated: Jul 02 2020 8:03PM
वारणावती (सांगली) : पुढारी वृत्तसेवा

चांदोली धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १३६ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे. गतवर्षी आज २ जुलै अखेर ३४२ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा मात्र ४७८ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठाही यंदा अधिक आहे. सध्या धरण ४१ टक्के भरले असून धरणात १४.१७ टीएमसी पाणीसाठा आहे.

मिरजेत आलेल्या 3 व्यक्‍तींना कोरोना

चांदोली परिसरात दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो त्यामुळे धरणही शंभर टक्के भरते. यंदाही पावसाने वेळेत सुरुवात केली आहे. सुरुवातीला दोन तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली. सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे बंद असणारी वीजनिर्मिती पुन्हा कार्यान्वीत झाली आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून सध्या ५५३ कयुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

कवठेएकंदचे सरपंच, ग्रामसेवकांवर फौजदारीचे आदेश

गेल्या चोवीस तासात येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आज अखेर ४७८ मिलिमिटर पाऊस पडला आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ४०१. ३० मीटर असून पाणीसाठा ४०१. ३० द.ल. घ.मी.(१४.१७ टीएमसी) इतका आहे.