कोरोनाबाधित दोघे अतिदक्षता विभागात 

Last Updated: May 23 2020 1:44AM
Responsive image


सांगली : पुढारी वृत्तसेवा

बलवडी (ता. खानापूर) व मोहरे  (ता. शिराळा) येथील कोरोनाबाधित दोन व्यक्‍ती ऑक्सिजनवर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लक्ष्मीनगर (सांगली) येथील बाधित बावन्‍न वर्षीय व्यक्‍तीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, क्षयरोगामुळे प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, शुक्रवारी धारावीतून आलेली एक महिला व वाळव्यातील चांदोली वसाहतमधील तरुणाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सांगली कारखान्याजवळील लक्ष्मीनगर येथील 52 वर्षीय व्यक्‍तीचा चाचणी अहवाल दि. 16 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. ही व्यक्‍ती मिरज शासकीय रुग्णालयात उपचाराखाली आहे. शुक्रवारी या व्यक्‍तीचा चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. 

मात्र, या व्यक्‍तीला क्षयरोग असून त्यांची प्रतिकारशक्‍ती अत्यंत कमी आहे. या व्यक्‍तीची प्रकृती चिंताजनक आहे. हा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांची उपचारासाठी शर्थ चालू आहे, असे डॉ. साळुंखे 
यांनी सांगितले. बलवडी (ता. खानापूर) येथील 55 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष व मोहरे येथील कोरोनाबाधित रुग्ण हे दोघे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दोघांवरही डॉक्टरांचे लक्ष आहे.

धारावी येथून आलेल्या व्यक्‍तींपैकी 20 व्यक्‍तींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी 14 जणांच्या स्वॅबचे अहवाल शुक्रवारी प्राप्‍त झाले. त्यातील 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर 37 वर्षीय एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला सुट्टीसाठी  उत्तर शिवाजीनगर सांगली येथे येणार होती. तथापि धारावीतून आलेल्या सर्व लोकांना इस्लामपूर येथेच ताब्यात घेऊन त्यांची रवानगी मिरज आयसोलेशन कक्षाकडे करण्यात आली. वाळव्यातील चांदोली वसाहतीतील 22 वर्षीय  तरुणाचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे. हा तरूण पुण्याहून चांदोली वसाहत येथे आलेला आहे.

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा
तुमकुर (कर्नाटक) येथे जाऊन  आलेल्या बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन्ही तरुणांचा कोरोना अहवाल अखेर निगेटिव्ह आला.  दोन्ही व्यक्तींचा कर्नाटकातून आलेला अहवाल पॉझिटिव्ह होता. आता अहवाल  निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासन आणि बोरगावकारांना दिलासा मिळाला. तालुका प्रशासनाने दोन्ही व्यक्तीच्या कुटुंबातील एकूण 9 व्यक्तींना तात्पुरते संस्थात्मक विलीगिकरण केले आहे. 
शुक्रवारी सकाळी बोरगाव येथील दोघे जण कोरोना बाधित आढळल्याची बातमी पसरली. गावात सकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. पाटील आणि आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना गावातील प्रत्येक घराचा आणि व्यक्तीचा सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदार बी. जे. गोरे, मंडल अधिकारी बी. एस. नागरगोजे यांनी गावात भेट देऊन सरपंच सहदेव परीट, उपसरपंच नामदेव पाटील, तलाठी अमृत गायकवाड, ग्रामसेवक एम. आर. पाटील यांना सूचना दिल्या.

 तातडीची उपाययोजना म्हणून गावातील अन्य लोकांमध्ये आणि बाहेरील लोकांमध्ये संक्रमण होऊ नये, यासाठी काही बाबी सुचविण्यात आल्या. दरम्यान, बेंगलोर येथील कोरोना अहवालामध्ये संभ्रम असल्यामुळे मिरज येथील कोविड रुग्णालयात घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल काय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सायंकाळी मिरज कोविड रुग्णालयाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे बोरगावकारांना दिलासा मिळाला.

गुलमोहोर कॉलनीतील महिला कोरोनामुक्‍त

सांगली येथील गुलमोहोर कॉलनीतील कोरोनाबाधित महिलेचा 14 दिवसानंतरचा कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही महिला कोरोनामुक्‍त झाली आहे. 

गोव्याचे माजी मंत्री रमेश तडवकर यांची निर्दोष मुक्तता


शुभमन गिलनं सुनिल गावसकरांचं ५० वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मोडलं!


मुंबईत डिझेलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर


'टोमॅटो एफएम'च्या 'फॅनक्लब काँटेस्ट'मध्ये सहभागी व्हा आणि बक्षिसं जिंका!


औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या गाडीवर दगडफेक


उस्मानाबाद : ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने माजी सैनिकांचा जागीच मृत्यू


मानसी नाईक अडकली लग्नबंधनात (video)


अन् अजिंक्य रहाणेने वर्णद्वेषी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचीही मने जिंकली


राज्यातील सरपंचदाचा निर्णय 'या' महिन्यात होणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


बीसीसीआयकडून टीम इंडियाला ५ कोटी रूपयांचे विशेष गिफ्ट