Sat, Sep 19, 2020 12:07होमपेज › Sangli › 'भाजपच्या चुकीच्या धोरणांनी देशाचे वाटोळे'

'भाजपच्या चुकीच्या धोरणांनी देशाचे वाटोळे'

Last Updated: Sep 17 2020 12:59PM
सांगली : पुढारी ऑनलाईन

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उद्योगधंदे मोडकळीस आले. बेरोजगारी वाढत आहे. जीडीपी दर घसरला आहे. एकूणच भाजपने देशाचे वाटोळे केले आहे, असा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी हा आरोप केला आहे. राष्ट्रीय बेरोजगार दिनानिमित्त येथील काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांना अडचणीत आणल्याचा आरोप करत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कांद्याचा हार अर्पण करण्यात आला. यावेळी उत्कर्ष खाडे, उपाध्यक्ष संदीप चव्हाण,  सौरभ पाटील, सनी धोत्रे, अरविंद पाटील, योगेश राणे आदी उपस्थित होते.

 "