Sat, Sep 19, 2020 07:15होमपेज › Sangli › मिरजेतील आणखी एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह 

मिरजेतील आणखी एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह 

Last Updated: Jul 14 2020 7:30PM
मिरज : पुढारी वृत्तसेवा 

शहरातील आणखी एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांचा मिरज ग्रामीण भागात ४३ इतका आकडा झाला आहे. शहरातही हा आकडा २५ च्या पुढे गेला आहे. मिरज शहरातील तीन रुग्णालये कोरोनामुळे सील करण्यात आली आहेत. मिरजेतील दोन डॉक्टर, दोन नर्स यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोना झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. ते बरे होऊन आता मिरजेत आले आहेत. आज सुंदर नगरमध्ये राहणाऱ्या आणखी एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

या डॉक्टरांची मिरजेतील वंटमुरे कॉर्नर परिसरात प्रयोगशाळा आहे. ते तपासणीसाठी सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात नेहमी जातात. सांगलीच्या त्या रुग्णालयामध्ये अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे काळजी म्हणून या डॉक्टरांनीही तपासणी करून घेतली होती. आज त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.  मात्र त्यांना शारीरिक त्रास कोणताही नाही. त्यांच्या दोन मुली व पत्नी यांना क्वॉरंटाइन  करण्यात आले आहे. दोन मुलींपैकी एका मुलीची तपासणी करण्यात आली. त्या मुलीचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. मात्र खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन केले आहे.

 "