Wed, Aug 12, 2020 09:53होमपेज › Sangli › सांगली : वाळवा तालुक्यात आणखी एकाला कोरोना 

सांगली : वाळवा तालुक्यात आणखी एकाला कोरोना 

Last Updated: Jun 13 2020 2:02PM

संग्रहित छायाचित्रइस्लामपूर : पुढारी  वृत्तसेवा 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात शनिवारी (ता.१३) एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. फाळकेवाडी येथील ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती व्यक्ती चालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या वाळवा तालुक्यात या आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा ५ वर गेला आहे.

शुक्रवारी राजारामनगर येथील महिला व येलूर येथील युवतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. राजारामनगर येथील महिलेचा पती व दोन मुलांचे अहवाल अजून यायचे आहेत. यापुर्वी गेल्या चार पाच दिवसात येलुर येथील व्यक्तीचा व इस्लामपुर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे कोरोनामुक्त वाळवा तालुक्यात आता कोरोनाचे नवे ५ रुग्ण झाले आहेत.