कवठेमहंकाळ (सांगली) : पुढारी वृत्तसेवा
कवठेमहंकाळ तालुक्याच्या पश्चिमेकडील दंडोबाच्या डोंगरावरील गुहेत बुधवारी(दि.१३) प्राचीन शिवलिंग सापडले आहे. खरशिंग येथील काही तरुण आणि पुजारी यांनी सलग दहा दिवस खोदकाम केले असता गुप्तलिंग गुहेपासून पंधरा फूट अंतरावर हे प्राचीन शिवलिंग सापडले आहे. दंडोबा डोंगरावर प्राचीनकालीन गुहा आहेत. गुहेत एक शिवलिंग आहे. तर मोठे शिखर आहे. तसेच डोंगरावर दंडनाथाच्या मुख्य मंदिरबरोबर गुप्तलिंग आणि केदारलिंग अशा गुहा आहेत. या गुहेमध्ये प्राचीन काळातील शिवलिंग आहेत.
अधिक वाचा : धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
काही दिवसांपुर्वी खरशिंग (ता. कवठेमहंकाळ) गावातील पाच ते सहा तरुण आणि दंडोबा डोंगरावरील पुजारी बाळासाहेब गुरव, मुलगा अवधुत गुरव आणि त्याचा मित्र ऋषी पाटील डोंगरावरील दंडोबा मंदिराच्या शेजारी असलेल्या गुप्तलिंग गुहेजवळ स्वच्छता करत होते. त्यावेळी त्यांना शेजारी आणखी एक गुन्हा असल्याचे जाणवले. यानंतर सर्वांनी मिळून त्या ठिकाणी खोदकाम सुरु केले. खोदकाम करीत असताना खरशिंगचे तरुण आणि पुजा-यांना डोंगरावरील गुप्तलिंग गुहेशेजारी सुरुवातीला शिवलिंगाची शीळ सापडली. यानंतर त्यांनी खोदकाम सुरुच ठेवले होते.
अधिक वाचा : औरंगाबाद : पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांची राजकारणातून निवृत्ती
खोदत- खोदत पुढे जाताना पंधरा फूटावर आतमध्ये गुहेत भिंतीवर एका ठिकाणी ओलसर जागेत ॐ आकाराची प्रतिकृती दिसून आली. त्या सर्वांनी आणखी शोधाशोध केली असता तांबड्या रंगाचे शिवलिंग सापडले. तरुणांनी शिवलिंगाची स्वच्छता करून पूजा केली आहे.