सांगली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पाच जणांना अटक केली. या प्रकरणी निलेश विठोबा गडदे (वय २१), सचिन अज्ञान चव्हाण (वय २२), वैभव विष्णू शेजाळ (वय २१तिघे रा. वाघमोडेनगर, कुपवाड), मृत्युंजय नारायण पाटोळे (वय २७, रा. यशवंतनगर) आणि किरण शंकर लोखंडे (वय १९, रा. वाघमोडेनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
वाचा : सांगली राष्ट्रवादी जिल्हा शहर उपाध्यक्षाचा निर्घृण खून
कुपवाड एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दत्तात्रय महादेव पाटोळे यांचा पाठलाग करून धारधार हत्याराने ११ वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला होता याबाबत अस्पष्टता होती. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या वादावादीतून हा खून झाल्याचे आज निष्पन्न झाले. यानंतर या प्रकरणातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.