Sat, Sep 19, 2020 11:02होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यात ८६५ रुग्ण; ४० व्यक्‍तींचा मृत्यू

सांगली जिल्ह्यात ८६५ रुग्ण; ४० व्यक्‍तींचा मृत्यू

Last Updated: Sep 17 2020 2:14AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी 865 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 238 व्यक्‍तींचा समावेश आहे. जिल्ह्यातील 38 आणि परजिल्ह्यातील 2 व्यक्‍तींचा मृत्यू झाला. उपचाराखालील 1 हजार 39 व्यक्‍ती अतिदक्षता विभागात आहेत. बुधवारी दिवसभरात 613 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त झाल्या. 

जिल्ह्यात बुधवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 25 हजार 653  झाली आहे. एकूण 15 हजार 437 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त  झाल्या आहेत. सध्या 9 हजार 247 व्यक्‍ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 1 हजार 39 व्यक्‍तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील 864  व्यक्‍ती ऑक्सिजनवर, 111 व्यक्‍ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, 54 व्यक्‍ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर आणि 10 व्यक्‍ती इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहेत. उपचाराखालील 6 हजार 661 व्यक्‍ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. बुधवारअखेर एकूण मृत व्यक्‍तींची संख्या 969 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारी 238  व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 179 आणि मिरजेतील  59 व्यक्तींचा समावेश आहे. बुधवारअखेर सांगली महापालिका क्षेत्रातील एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 11  हजार 74  झाली आहे.

बुधवारी कवठेमहांकाळ 19, कोंगनोळी 8, बोरगाव 4, आरेवाडी 4, हिंगणगाव, झुरेवाडी, आगळगाव, रांजणी, कुकटोळी, कुची, कदमवाडी येथील प्रत्येकी 3, देशिंग 2, शिरढोण, जाधववाडी, नागज, नांगोळे, करोली टी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. आटपाडी 10, निंबवडे 5, वाक्षेवाडी 3, दिघंची 6, लिंगिवरे 1, राजेवाडी 1, मिटकी 2, तडवळे 1, जांभुळणी 1, खरसुंडी 1, झरे येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. तासगाव 11, सावळज 12, येळावी 5, वायफळे 4, वडगाव, नेहरूनगर, मणेराजुरी, बिरणवाडी येथील प्रत्येकी 2, आळते, बस्तवडे जरंडी, डोंगरसोनी, निमणी, राजापूर येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. पलूस 12, घोगाव 1, बांबवडे 2, माळवाडी 4, आमणापूर 1, ब्रह्मनाळ 5, दुधोंडी 1, अंकलखोप 4, बुरुंगवाडी 1, पुणदी 2, भिलवडी येथील 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. विटा शहर 15, धोंडेवाडी 3, माहुली 1, भाळवणी 2, आळसंद 2, चिंचणी, भेंडवडे, भडकेवाडी आणि कुसबावडे येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. 

शिराळा 16, मणदूर 3, रेड 2, रांजणवाडी 2, शिराळेखुर्द 2, बांबवडे, पाचुंब्री, निगडी, बिऊर, अंत्रीखुर्द, पुणवत, तडवळे, पाडळी, कोकरूड, मालेवाडी, खिरवडे, बिळाशी, कणदूर, चिखली, आरळा, सोनवडे येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. कडेगाव 4, हिंगणगाव बुद्रुक 18, बेलवडे 3, चिंचणी 3, देवराष्ट्रे 2, कडेगाव 4, खेराडेवांगी 6, नेवरी 2, शिरसगाव 4, शिवणी 8, उपाळेवांगी 2, विहापूर 5, वांगी 5 तसेच अपशिंगे, हणमंतवडिये, कडेपूर, करांडेवाडी, शिवाजीनगर, सोहोली, उपाळेमायणी येथील प्रत्येकी 1 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आली. मिरज तालुक्यात म्हैसाळ 21, माधवनगर 4, सुभाषनगर 2, एरंडोली 4, तुंग 2, भोसे 3, सोनी 8, बुधगाव 2, बेळंकी 4, सलगरे 3, गुंडेवाडी 2 आणि मल्लेवाडी, पायापाचीवाडी, दुधगाव, बेडग, कळंबी, टाकळी, कवलापूर, सावळी, कवठेपिरान, नांद्रे येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली.  जत 15, संख 2, सोन्याळ 1, उमराणी 2, व्हसपेठ 2, अंकलगी येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली. इस्लामपूर 20, नेर्ले 3, वाळवा 2, आष्टा 3, बहादूरवाडी 1, शिरगाव 1, साखराळे 4, बोरगाव 3, ताकारी 5, पेठ 3, कामेरी 3, गोटखिंडी 2,कापूसखेड 1, ऐतवडे खुर्द 1, फार्णेवाडी 1,  भवानीनगर 1, नरसिंहपूर 2, रेठरेहरणाक्ष 3, वाटेगाव येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. 

 "