Wed, Sep 23, 2020 09:49होमपेज › Sangli › धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहातील आणखी ४० कैदी पॉझिटिव्ह (Video)

धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहातील आणखी ४० कैदी पॉझिटिव्ह (Video)

Last Updated: Aug 09 2020 11:25AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील आणखी ४० कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी ८१ कैदींसह प्रशासनातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता कारागृहातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १२४ वर पोहोचला आहे.

 सांगली जिल्हा कारागृहात आणखी ४० बंदी कोरोनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा कारागृहात दि. 3 ऑगस्ट रोजी कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यावेळी प्रशासनातील तिघांसह ८५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील एक कैदी चाचणीनंतर जामीनावर बाहेर गेला होता. 

दोन दिवसांपूर्वी कारागृहात१५० जणांची  चाचणी घेण्यात आली. त्यातील ४०जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना उत्तर शिवाजीनगर येथील एका महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे. 

जिल्ह्यातील २५५ आणि परजिल्ह्यातील ९ असे एकूण २६४ नवे कोरोना रुग्ण शनिवारी आढळले. त्यामध्ये सांगलीतील १३३ व मिरजेतील ४७ जणांचा समावेश आहे. शनिवारी जिल्ह्यातील ९ आणि परजिल्ह्यातील २ अशा एकूण ११ व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ९ व्यक्तींमध्ये सांगलीतील ४, मिरजेतील ३ व वाळवा तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाबाधित १७३ व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 "