Sat, Sep 19, 2020 11:51होमपेज › Sangli › सांगलीत आणखी ४ पोलिसांना कोरोना

सांगलीत आणखी ४ पोलिसांना कोरोना

Last Updated: Jul 24 2020 6:19PM

संग्रहित छायाचित्रसांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली पोलिस दलातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (ता.२४) स्पष्ट झाले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात महापालिकेतर्फे केलेल्या अँटिजेंन चाचणीत एका महिलेसह चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजअखेर पोलीस दलात ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अधिक वाचा :   धनंजय महाडिक यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट 

मिरजेतील महिला पोलिस अधिकारी पॉझिटिव्ह आल्यानंतर ४ दिवसांनी सलग दुसऱ्या दिवशी आणखी पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. चार दिवसापूर्वी मिरजेतील एक महिला पोलीस अधिकारीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांनंतर पोलिस दल खडबडून जागे झाले होते. गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात महापालिकेतर्फे शहर पोलिस ठाणे, वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अँटिजेंन चाचणी घेण्यात आली. 

अधिक वाचा :  कोल्हापूर : कोरोना मृतांचा आकडा शंभरीवर!

यावेळी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचेही चाचणी घेण्यात आली. यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याकडील एक उपनिरीक्षक आणि वाहतूक शाखेकडील दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात शुक्रवारी महापालिकेतर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अँटिजेंन चाचणी घेण्यात आली. यात एका महिला पोलिसासह चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 "