Fri, May 07, 2021 19:03होमपेज › Sangli › सांगली: २२ शिक्षकांना कोरोनाची लागण

सांगली जिल्ह्यातील २२ शिक्षकांना कोरोनाची लागण

Last Updated: Nov 22 2020 4:43PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

राज्यात शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार सांगली जिल्ह्यात उद्यापासून 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 6 हजार 249 शिक्षकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 22 जण कोरोना बाधित आढळून आले.

त्यामध्ये आटपाडी 3, जत 7, कडेगाव 1, कवठेमहांकाळ 2, मिरज 6, शिराळा 1, तासगाव 1 आणि वाळवा तालुक्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे.

राज्यात शाळा सुरू करायच्या किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था होती. परंतु शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये कोरोनाचा संसर्ग होवूनये यासाठी शासनाने शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 6 हजार 249 शिक्षकांची तपासणी करण्यात आली त्यातील 22 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचे होम आयसोलेशन करण्यात येणार आहे.