Thu, Aug 06, 2020 04:26होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यात १७ रुग्णांची वाढ

सांगली जिल्ह्यात १७ रुग्णांची वाढ

Last Updated: Jul 13 2020 4:42PM
सांगली : पुढारी ऑनलाईन 

सांगली जिल्ह्यात सोमवारी (दि. १३) दुपारपर्यंत कोरोनाच्या नव्या १७ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ६५८ वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये सांगली, मिरज शहरातील ९ जणांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात रविवारी (दि. १२) तीन वृद्ध महिलांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला होता. यात मिरजेतील दोन महिलांचा समावेश होता. तर सांगोला येथील महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यात रविवारी ९ रुग्ण सापडले होते. यात सांगलीत २, पलूस, सोनी, बुधगाव, येथील प्रत्येकी एक व कोकळे येथील ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या १०० पार गेली आहे.