Sun, Aug 09, 2020 10:14होमपेज › Sangli › सांगली : कोरोनाने 14 जणांचा मृत्यू

सांगली : कोरोनाने 14 जणांचा मृत्यू

Last Updated: Aug 02 2020 1:35AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात  शनिवारी ‘कोरोना’चे आणखी 156 रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील 4 व्यक्‍तीही कोरोना पॉझिटिव्ह आल्या. सांगली महापालिका क्षेत्रातील 92 आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागातील 64 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.  शनिवारी जिल्ह्यातील 12 आणि परजिल्ह्यातील 2 व्यक्‍तींचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एका दिवशी एवढे मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे. 

जिल्ह्यात शनिवारअखेर एकूण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 2 हजार 799 झाली आहे. शनिवारी 138 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली. शनिवारअखेर एकूण 1 हजार 266 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 443 व्यक्‍ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 96 व्यक्‍तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शनिवारी जिल्ह्यातील 12 व्यक्‍तींचा मृत्यू झाला. शनिवारअखेर एकूण मृत व्यक्‍तींची संख्या 90 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 92 व्यक्‍ती शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 73 आणि मिरज येथील 19 व्यक्‍तींचा समावेश आहे. सांगलीत खणभाग 12, सांगलीवाडी हारूगडे प्लॉट 6, मंगेश्‍वर चौक 1, विश्रामबाग 4, पवार प्लॉट हरिपूर रोड 6, विजयनगर 3, कोल्हापूर रोड 6, सूर्यवंशी प्लॉट 2, मंगलमूर्ती कॉलनी 2, हसनी आश्रमजवळ 1, संजयनगर 2, चांदणी चौक 1, हडको कॉलनी 1, गणेशनगर 1, वखारभाग 3, शामरावनगर 1, शेवाळेगल्ली 1,  राणाप्रताप चौक कुपवाड 2, कुपवाड 1. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल 8, पंढरपूर रोड 2, अमननगर 1, खतीबनगर 1, वंटमुरे कॉर्नर 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली. 

खणभाग बनला कोरोना हॉटस्पॉट

शुक्रवारी सांगलीतील खणभाग येथील 40 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. शनिवारी आणखी 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. खणभाग कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. 

तासगाव तालुक्यात नवे 17 रुग्ण

तासगाव तालुक्यात शनिवारी 17 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. तासगाव शहरातील 8, मणेराजुरी येथील 3, कुमठे 1, नेहरूनगर 2, नागाव (निमणी) येथील 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. 

कवठेमहांकाळ तालुका 11 रुग्ण

शनिवारी कवठेमहांकाळ तालुक्यातील 11 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. बोरगाव येथील 3, कवठेमहांकाळ येथील 5, घाटनांद्रे येथील 1, झुरेवाडी येथील 1, कुकटोळी येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली. 

मिरज ग्रामीण : 19 पॉझिटिव्ह

मिरज तालुक्यात कसबे डिग्रज येथील 5, माधवनगर येथील 11, बामणोली येथील 1, हरिपूर येथील 1  आणि मालगाव येथील 1 व्यक्ती  कोरोना पॉझिटिव्ह आली. 

शिराळा येथील 1 व बिळाशी (ता. शिराळा) येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. सुरूल  (ता. वाळवा) येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. आटपाडी येथील 2, मापटेमळा येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. जत शहरातील 1 व्यक्ती, बाज (ता. जत) येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली. चिखलहोळ (ता. खानापूर) येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली. कडेगाव तालुक्यात शनिवारी 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये कडेगाव येथील 1, नेर्ली येथील 1, आसद येथील 5 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. 

जिल्ह्यातील 12, परजिल्ह्यातील 2 व्यक्‍तींचा मृत्यू

सांगली येथील 62 वर्षीय पुरुष, तासगाव येथील 64 वर्षीय पुरुष, जत येथील 30 वर्षीय पुरुष, सांगलीतील 44 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय पुरुष, मिरजेतील 78 वर्षीय पुरुष, बेडग (ता. मिरज) येथील 60 वर्षीय महिला, सांगलीतील 82 वर्षीय महिला, बुधगाव येथील 54 वर्षीय पुरुष व 63 वर्षीय पुरुष, सांगलीतील 63 वर्षीय पुरुष व 83 वर्षीय पुरुष यांचा शनिवारी मृत्यू झाला. रत्नागिरी येथील 56 वर्षीय पुरुष व बेळगाव येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

ऑक्सिजनवर 74 व्यक्‍ती, व्हेंटिलेटरवर 22 व्यक्‍ती

जिल्ह्यात शनिवारअखेर एकूण 1 हजार 443 व्यक्‍ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 74 व्यक्‍ती ऑक्सिजनवर आहेत. 21 व्यक्‍ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आणि 1 व्यक्‍ती इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहे.