Mon, Aug 03, 2020 15:30होमपेज › Sangli › पुढारी कस्तुरी क्लबतर्फे उद्या ‘स्वर तरंग’- ऑनलाईन कायक्रम

पुढारी कस्तुरी क्लबतर्फे उद्या ‘स्वर तरंग’- ऑनलाईन कायक्रम

Last Updated: May 04 2020 10:32PM
कोल्हापूर ः व्हायोलिनचे सूर हे नेहमीच व्यक्तीचे मन मोहवून टाकतात आणि शब्दाशिवाय मनाला सुखद अनुभव देऊन जातात आणि मग ही अनुभूती मनात साठवून ठेवाविशी वाटते. म्हणूनच कस्तुरी क्लबतर्फे या खास कार्यक्रमाचे आयोजन.

कस्तुरी कल्बतर्फे लॉकडाऊन च्या काळातही सभासदांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. स्पर्धा, रेसिपीशो, मनोरंजनात्मक कार्यक्रम Live दाखवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या ‘अबतक बच्चन’ या कार्यक्रमानंतर आता ‘स्वर-तरंग’ या सुमधूर व्हायोलिन वादनाच्या लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   हा कार्यक्रम उद्या बुधवार, दि. 6 मे रोजी सायंकाळी 4.00 वाजता आपल्या कुटुंबियांसह घरी राहूनच एन्जॉय करता येणार आहे. व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केदार गुळवणी हे करणार असून या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी फेसबुकवर Kasturi Club Pudhari पेज सर्च किंवा  https://www.Facebook.com/tomatobrigade या लिंकवर ङेसळप करा. अधिक माहितीसाठी संपर्क. 9096853977 / 8308706122 कस्तुरी क्लब टाईम : कस्तुरी क्लब आणि टोमॅटो एफ.एम. आयोजित कस्तुरी क्लब टाईम यामध्ये या आठवड्यात कस्तुरी क्लब सभासदांनी दोन उपक्रम करावयाचे आहेत.

1) लॉकडाऊनमध्ये कुठे अडकून पडायला आवडले असते आणि का? यासंबंधी रेकॉर्डिंग करून व्हॉटसअ‍ॅपवर पाठवायचे आहे.निवडक रेकॉर्डिंग आठवड्यात मंगळवार आणि शुक्रवार दु. 1 ते 2 यावेळेत टोमॅटो एफ.एम.वर लिप्सस्टिकवाले सपने या शोमध्ये लावले जातील. 2) स्पर्धेसाठी - एकाच रंगाची वेशभूषा करून फोटो पाठवणे. उत्कृष्ट वेशभूषेला आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.