Mon, Jan 18, 2021 10:17होमपेज › Pune › पुणे : तरुणावर गोळ्या झाडून खून

पुणे : तरुणावर गोळ्या झाडून खून

Last Updated: Jul 13 2020 11:49AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

मागील काही दिवसांपासून शहरात सुरु असलेले खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी मध्यरात्री पर्वती परिसरातील शाहू वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून व कोयत्याने वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अमित मिलिंद सरोदे (वय २१,रा.गल्ली क्रमांक २५,जनता वसाहत, पर्वती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा :  एकाच दिवसात ३२ जणांचा बळी

आदर्श ननावरे, बोंबल्या व यशवंत कांबळे (तिघेही रा. जनता वसाहत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सौरभ महेश मोहोळ ( वय २१,रा. जनता वसाहत) याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र अमित सरोदे हा जनता वसाहतीमधील शाहू वसाहतीसमोरील बालाजी होलसेलर या दुकानासमोर रात्री पावणे अकरा वाजता गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आदर्श ननावरे व बोंबल्या दुचाकीवरुन तेथे आले. आदर्शने त्याच्याकडील पिस्तुलातून अमितवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर बोंबल्या व आदर्शने त्याच्याकडील कोयत्याने अमितवर वार केले. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

वाचा : वरवरा राव यांना अत्यावश्यक सोयीयुक्त रुग्णालयात भरती करा