Mon, Jun 01, 2020 03:20होमपेज › Pune › पुणे : ताम्हिणी घाटातील अपघातात ३ ठार, दोघे जखमी  

पुणे : ताम्हिणी घाटातील अपघातात ३ ठार, दोघे जखमी 

Last Updated: Feb 21 2020 1:15AM

अपघातातील कारमाणगाव  : पुढारी वृत्‍तसेवा

आपल्या मित्रांसोबत कोकणातील दिवेआगार येथे पर्यटनासाठी निघालेली एर्टिगा कार ताम्हिणी घाटातील अवघड उतारावर रस्त्यालगत असणार्‍या झाडाला आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ३ तरुण जागीच ठार झाले. तर यातील दोघेजण जखमी झाले. ही घटना कोंडेथर गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. २०) रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात मिळाल्याने माणगाव पोलिस निरिक्षक रामदास इंगावले आणि त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यातील एका तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

वाचा : गुरुवार ठरला घातवार; विविध अपघातांत ३८ ठार

पुणे- आळंदी रोड येथील ५ तरुण दिवेआगार येथील कोकणात एर्टिगा कार (क्र. एमएच १२ एमबी १३२०) या कारने पर्यटनासाठी निघाले होते. गुरूवारी रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्यालगत असणार्‍या झाडावर आदळली. या अपघातात कारचालक निखिल घुले (वय २६), चंद्रकांत निकम (वय २८), विक्रम सिंग (वय ३१) हे (सर्व रा. बोपखेल, गणेशनगर) तीन तरुण जागीच ठार झाले. तर विजय गोरख पाटील (वय २८) आणि सुनिल बालाजी तेलंगे (वय २७) (दोघेही रा. बोपखेल गणेशनगर) हे दोन तरुण जखमी झाले आहेत.

वाचा : तामिळनाडूत भीषण अपघात, २० जणांचा मृत्यू

या अपघातातील जखमींपैकी सुनिल तेलंगे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तर विजय गोरख पाटील याच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.