Sat, Apr 10, 2021 19:25
उशाखालील पैशावर चोरट्याचा डल्ला, कोंढवा खुर्द परिसरातील घटना

Last Updated: Apr 08 2021 5:00PM

संग्रहित छायाचित्र
पुणेः पुढारी वृत्तसेवा

उशाखाली १ लाख ५ हजार रुपये ठेऊन मोकळ्या जागेत झोपणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी त्यांच्या उशाखाली ठेवलेली रक्कम चोरुन करून पळ काढला. ही घटना दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास कोंढवा खुर्द परिसरातील टिळेकरनगरमध्ये घडली. याप्रकरणी पांडू खटरावत (वय ४५, रा. टिळेकरनगर, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

अधिक वाचा : भाजपला धक्का; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडु गवंडी मजुरीचे काम करतात. ते कुटूंबियासह येवलेवाडीतील टिळेकरनगरमध्ये वास्तव्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना कामाचे पैसे मिळाले होते. मात्र, घरात खूपच उकाडा असल्यामुळे ते मोकळ्या जागेत झोपी गेले. साोबत १ लाख ५ हजारांची रक्कमही नेली. उशाखाली पैसे ठेउन ते मोकळ्या जागेत झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या उशाखालील रोकड चोरून नेली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रक्कम मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक चैत्राली गपाट करीत आहेत