Thu, Jun 24, 2021 11:32
तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार; ठाकरे- मोदी भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

Last Updated: Jun 09 2021 7:56PM

पुणे : पुढारी ऑनलाईन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल भेट झाली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दरम्यान यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहीत नाही. पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत' असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यातील जुन्या मैत्रीची चर्चा रंगली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

अधिक वाचा : 'केंद्र सरकार कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्यात अपयशी'

काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ भेटले याचे आम्ही कौतुक करतो. राज्याच्या हितासाठी पंतप्रधानांकडे सत्ताधारी गेले ही बाब नक्कीच चांगली असल्याचे पाटील म्हणाले. दोन मोठ्या माणसाच्या भेटीत काय घडले असले हे सांगता येत नाही. वाघाबरोबर आमची दुश्मानी कधीच नव्हती. उद्धवजी आणि मोदीजी यांची जुनी मैत्री आहे. जर आमच्याशी मैत्री असती तर १८ महिन्यांपूर्वी आमचे सरकार आले असते, असेही पाटील म्हणाले.

या भेटीदरम्यान त्यांनी केलेल्या काही मागण्यांचं स्वागत करतो पण मराठा आरक्षण संबंधीची मागणी ही दिशाभूल करणारी आहे. केंद्राकडे आणि मोदींकडे आरक्षणाचा काहीच मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. पण, केंद्राने यावर मार्ग काढण्यास प्रयत्न करण्याचे सांगितलं आहे. पण मराठा आरक्षण आणि केंद्राचा काहीच संबंध नाही तो राज्य सरकारचा अधिकार आहे' अशी टीका पाटील यांनी केली.

अधिक वाचा : खरीप हंगामातील पिकांसाठी किमान हमीभाव जाहीर