होमपेज › Pune › ‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट

‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे: प्रतिनिधी

शहरात ‘स्वाइन फ्लू’ चा एकही रुग्ण नसून ‘स्वाइन फ्लू’ एक्झिट घेतली आहे. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. हवामान बदल आणि लसीकरणामुळे रुग्ण संख्या शुन्यावर आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

गेल्या दोन दिवसात स्वाइन फ्लू च्या एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.  तसेच आठवडाभरापूर्वी खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर एक तर साधारण वार्डमध्ये एक असे दोन रुग्ण उपचार घेत होते.  पण त्या रुग्णांंवर उपचार करून ‘डिस्चार्ज’ मिळाला असून सध्या एकही रुग्ण शहरामध्ये नाही, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

सध्या शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. पण ही संख्या वाढलेली असतानाच स्वाइन फ्लूची एक्झिट झाल्याने नागरिकांच्या आणि आरोग्य विभागावरील ताण हलका झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण शहरात स्वाइन आणि डेंग्यूचे सावट दिसले. यंदाच्या वर्षांतील स्वाइनमुुळे सर्वाधिक 124 मृत्यू पुणे शहरात झाले आहेत.  मात्र ऑक्टोबर महिन्यापासून स्वाइन फ्लू च्या संशयित आणि पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसली. 

   29  नोव्हेंबर रोजी  रुग्णांच्या तपासणीमध्ये  58 रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आल्या असून  4 रुग्णांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठवण्यात आला. शिवाय एकही नव्या रुग्णांची नोंद झाली नाही. तर आतापर्यंत 702 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते व त्यापैकी 552 रुग्ण बरे होउन घरी गेले.