Sun, Dec 06, 2020 00:08होमपेज › Pune › हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:04AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सध्या युट्युबवर गाजत असणार्‍या बोल्ड साँगमधील दोन मॉडेलसह उजबेकिस्तान आणि रशियन देशातील दोन तरुणींना पुण्यात वेश्या व्यावसायासाठी आणले होते.  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून दोन विदेशी तरुणींची  सुटका केली आहे. दरम्यान पोलिसांनी मुंबईवरून पुण्यात आणून चालविल्या जाणार्‍या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा या माध्यमातून पर्दाफाश केल्यामुळे खळबळ उडाली आहे.  मधू रिकाडो स्मिथ (वय 58) आणि सोनिया जिवनलाल बधवाना (वय 42, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांकडून पेट्रोलिंग तसेच गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान गुन्हे शाखेच्या दक्षिण गुंडा स्कॉडचे पोलिस निरीक्षक राम राजमाने यांना माहिती मिळाली की, मुंबई येथील दोन महिला एजंट या मॉडेलिंग करणार्‍या तरुणी आणि परदेशी मुलींना घेऊन वेश्या व्यवसायासाठी पुण्यात येणार आहेत. त्यानुसार, बनावट ग्राहक तयार करून मधू स्मिथ आणि सोनिया यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी हिंजवडी परिसरातील हॉटेल ऑर्चिड समोरील चौकामध्ये ओव्हर ब्रिजच्या खाली येण्यास सांगितले. पोलिसांनी  येथे सापळा रचला. त्यावेळी एका कारमध्ये दोन महिला व एक तरुणी आली. त्यानंतर त्यांच्या पाठीमागे आणखी एका कारमध्ये तीन तरुणी आल्या. पोलिसांनी त्याचवेळी छापा टाकला. तसेच, दोघींना ताब्यात घेतले. तर, तरुणींची त्यांच्या तावडीतून सुटका केली. 

ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, हिंजवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरूण वायकर, सहायक निरीक्षक शीतल भालेकर, उपनिरीक्षक राजाराम सुर्वे, कर्मचारी रमेश चौधर, प्रविण पडवळ, रविंद्र कदम, शंकर जाभळे, प्रशांत पवार यांच्या पथकाने केली.   आंतरराष्ट्रीय रॅकेट सेक्स रॅकेटचे धागेधोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी हाँगकाँग, मलेशिया तसेच नेपाळमध्येही त्यांचे संपर्क असल्याचे समोर आले आहे. उजबेकिस्तान आणि रशियन तरुणीं टुरिस्ट व्हिसावर नोव्हेंबरमध्ये भारतात आल्या आहेत. या दोन्ही एजंट महिला यापूर्वीही पुण्यात आल्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर ट्रान्सलेटर डाऊनलोड केले आहे. पंचतारांकित हॉटेलमध्येच हा वेश्या व्यवसाय केला जात होत होता.