Wed, Aug 12, 2020 21:24होमपेज › Pune › टप्प्याटप्प्यानेच  बसचालकांची होणार भरती

टप्प्याटप्प्यानेच  बसचालकांची होणार भरती

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:50AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पीएमपीएमएलच्या ताफ्यात भविष्यात येणा-या बसेसची संख्या लक्षात घेता टप्प्याटप्प्याने चालकांची भरती करण्यात येणार आहे. सध्या 693 चालकांची भरती  प्रक्रीया गुणवत्तेनुसार सुरू असून,पुढील काळात सुमारे 2 हजार 440 चालक पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रीयेमुळे पीएमपी अधिक्ष सक्षम होण्यास सहकार्य मिळणार आहे. ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात सध्या महामंडळाच्या एक हजार 292 बसेस मार्गावर आहेत. याशिवाय बॉडीबिल्डिंगसाठी सुमारे 100 बसेस आहेत. तसेच खासगी ठेकेदारांच्या 450ते 500 बसेस मार्गावर धावत आहेत. महामंडळाच्या बसेसवर किमान 1 हजार 500 चालक कार्यरत आहेत. पीएमपीचा वाढता विस्तार लक्षात घेता भविष्यात 800 बसेस तसेच 200 मिडी बसेस दाखल होतील. त्यामुळेच चालकांंंची संख्या वाढविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.त्यानुसार पहिल्या टप्प्यात चालक पदांसाठी परीक्षा घेतली होती.  

डिसेंबर महिन्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये चालक, वाहक आणि वर्कशॉप मधील कर्मचार्‍यांची भरती होणार होती. त्यानुसार या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाच्या छाननी पासून सर्व परीक्षेचे प्रक्रीया आऊट सोर्स करण्यात आले होती. त्यानुसार ही परिक्षा महाऑनलाईन या एजन्सीच्या माध्यमातून राज्यातील सर्व केंद्रावर एप्रिल 2017 मध्ये घेण्यात आली होती.  विशेषत:  चालक या पदांसाठी परीक्षा घेताना अतिशय काटेकोरपणे  कागदपत्रे तपासण्यात आली होती.चालक पदासाठी भरती करण्यात येणा-या उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या भोसरी येथे असलेल्या सीआयआरटी या संस्थेकडून वाहन चालविण्याची देखील चाचणी घेण्यात आली होती. 
त्यानंतर गुणवत्तेनुसार 693 चालकांची पदे भरण्याची प्रक्रीया सुरू आहे.त्यातही गरजेनुसार चालकांची भरती करण्यात येत आहे.पुढील काळात वाढणा-या बसेसची संख्या लक्षात घेता ऐनवेळी कोणतीही कर्मचा-यांची भरती करणे अवघड होऊन बसते हे लक्षात घेऊनच आतापासूनच त्याचे नियोजन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.