Wed, Aug 12, 2020 19:49होमपेज › Pune › एड्स मुक्त पुणे स्वप्न नव्हे ध्येय महापालिकेचा उददेश

एड्स मुक्त पुणे स्वप्न नव्हे ध्येय महापालिकेचा उददेश

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:50AM

बुकमार्क करा

णे : भूषण अहिरराव/ हेमराज शिंदे

जागतिक एड्स दिनानिमित्त ‘पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था’ आणि पुणे महानगरपालिकेतर्फे शहरात व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना एच.आय.व्ही. एड्सबद्दल आरोग्य शिक्षण पुरविण्यासाठी जनजागृती रथाचा शुभारंभ शुक्रवारी पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थातर्फे करण्यात आला. यावेळी ‘एड्स मुक्त पुणे, स्वप्न नव्हे ध्येय’ हा संकल्प करण्यात आला. 
एच.आय.व्ही. रोगाची चाचणी आणि उपचार जरी मोफत होत असले तरी नागरिकांना त्याची माहिती मिळावी म्हणून हा रथ शहरभर प्रबोधनाचे काम करणार आहे. शहर एड्स मुक्त होण्यासाठी संसर्गाचा प्रतिबंध होणे गरजेचे आहे. सरकारी दवाखान्यातील एकात्मिक सल्ला केंद्र खात्रीशीर सल्ला देऊन मातेकडून बाळाकडे होणार प्रसार, तसेच अन्य मार्गाने होणारा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शन करते, अशा आशयाचे संदेश जनजागृती रथाच्या माध्यमातून देण्यात आले. 

या आठवड्यात विश्रांतवाडी येथे एड्स विरोधी जनजागृती रॅली, शहरात रांगोळी प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अशा कार्यक्रमांचे आयोजन पुणे शहर एड्स मुक्त होईपर्यंत सुरू राहील, अशी माहिती पुणे महानगरपालिके च्या एड्स विभागाचे नोडल अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.