Mon, Sep 21, 2020 23:28होमपेज › Pune › मराठा अधिकारी, कर्मचार्‍यांची महापालिकेत संख्या किती

मराठा अधिकारी, कर्मचार्‍यांची महापालिकेत संख्या किती

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिकांमध्ये मराठा समाजातील किती अधिकारी आणि कर्मचारी आहेत, याची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेतील मराठा समाजाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची माहिती राज्य शासनाने मागविली आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

त्यासाठी राज्य सरकारनेही तत्त्वतः अनुकूलता दर्शविली आहे. राज्य शासनाने मराठा समाजाच्या सद्य:स्थितीचा अभ्यास सुरू केला आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार असून, त्यासंदर्भात अहवालही तयार करणार आहे. महापालिकेत एकूण मंजूर पदे किती आहेत, त्यामधील कार्यरत पदांची संख्या आणि त्यामध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये मराठा समाजातील संख्या किती आहे, ही माहिती विचारली आहे. दोन दिवसांत ही माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवायची आहे, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.