Thu, Aug 13, 2020 17:05होमपेज › Pune › पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोनामुक्त; क्वारंटाईन संपल्यानंतर 'ॲक्टिव्ह' होण्याची दिली ग्वाही!

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोनामुक्त; क्वारंटाईन संपल्यानंतर 'ॲक्टिव्ह' होण्याची दिली ग्वाही!

Last Updated: Jul 09 2020 9:01PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून रुग्णालयात असलेले महापौर मुरलीधर मोहोळ यांना गुरूवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांना 15 जुलैपर्यंत घरी राहण्यास सांगण्यात आले आहे. महापौर मोहोळ यांना 4 जुलैला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबामधील सदस्यही पॉझिटिव्ह आले असल्यामुळे काहींवर रुग्णालयात तर काहींवर घरीच उपचार सुरु आहेत.

अधिक वाचा : 'सारथी'साठी तातडीने आजच्या आज ८ कोटींचा निधी उपलब्ध; अजित पवारांची तत्परता!

उपचारामुळे कोणतीही लक्षणे नसल्यामुळे मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. प्रशासनाकडून होम क्वारंटाईन राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि येथील कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर मी पुन्हा कार्यरत राहीन, अशी माहिती मोहोळ यांनी समाज माध्यमातून दिली आहे.

अधिक वाचा : कोरोना काळात कामगारांच्या सुरक्षेची उपाययोजना करावी : बाबा आढाव (video)

अधिक वाचा : पुणे : अवाजवी भाडे आकारल्याप्रकरणी रुग्णवाहिकेवर आरटीओची कारवाई