पंतप्रधानांकडून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना लसीचा आढावा

Last Updated: Nov 28 2020 5:39PM
पुणे :  पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ठरलेल्या वेळेत ४ वाजता दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरमद्वारे लसीची निर्मिती सुरु असलेल्या तीन प्रकल्पांना भेट देण्यासाठी आले आहेत. पंतप्रधान मोदींनी दिवसभरात गुजरातमधील अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. इथे झायकोव्हिड लसीची निर्मिती सुरु आहे. ही स्वदेशी लस आहे. पंतप्रधान मोदींनी भेट देऊन लस निर्मिती आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेत आहेत.

पंतप्रधान मोदी आता पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकासोबत करार केला. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लसीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.