Thu, Jul 09, 2020 23:10होमपेज › Pune › पुणे : संचारबंदीवेळी काही अडचण असल्यास येथे करा संपर्क 

पुणे : संचारबंदीवेळी काही अडचण असल्यास येथे करा संपर्क 

Last Updated: Mar 24 2020 1:24PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शहरात संचारबंदी लागू केली आहे. सुरूवातीला नागरिकांचा प्रतिसाद  मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या अडचणी शंकांना उत्तर देण्यासाठी आणि विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी पुणे पोलिसांनी चार व्हाट्सॲप क्रमांक निर्धारित केले आहेत.

9145003100
8975283100
9169003100
8975953100

अडचणीच्या प्रसंगी घराबाहेर न पडता यापैकी कोणत्याही एका क्रमांकावर संपर्क करा. नागरिकांनी केलेल्या विनंतीवर विचार केल्यानंतर, उत्तर त्याच व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश स्वरुपात पाठवले जाणार आहे. यावरुन सुविधा आणि काही सवलत दिली असल्यास केवळ अपवादात्मक परिस्थितीतच दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.