Fri, Sep 18, 2020 19:50होमपेज › Pune › बारामतीच्या तांदुळवाडी भागात युवकाला कोरोना 

बारामतीच्या तांदुळवाडी भागात युवकाला कोरोना 

Last Updated: May 23 2020 11:06AM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा 

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढतच आहे. बारामती शहरातील तांदुळवाडी भागात एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बारामती तालुक्यातील हा तेरावा रुग्ण आहे. शहरात कोरोनाला अटकाव करण्यात यश येत असताना पुन्हा रुग्ण सापडल्याने सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे.

वाचा :  इंदापूर तालुक्यात आणखी २ कोरोना रुग्णांची भर 

हा ३२ वर्षीय युवक एका अंत्यविधीसाठी नुकताच पुण्याला जावून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातच त्याला बाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तांदुळवाडीतील कल्याणीनगर भागात तो राहतो. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत तो नोकरी करतो. त्याच्या हायरिस्कमधील आठ जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले असून या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. 
शहरात गेले दीड महिना कोरोनाचा रुग्ण मिळाला नव्हता. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार शुक्रवार (दि. २२) पासून सुरु झाले असताना पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. 

वाचा :पुण्यात उच्चांकी 358 नवे रुग्ण

 "