Mon, Aug 10, 2020 05:01होमपेज › Pune › जुन्नर तालुक्यात कोरोनाने माजी सरपंचाचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात कोरोनाने माजी सरपंचाचा मृत्यू

Last Updated: Jul 15 2020 4:36PM

संग्रहित छायाचित्रनारायणगांव (पुणे) : पुढारी वृत्तसेवा 

पुणे जिल्ह्यातील नारायणगांव तर्फे आर्वी (ता. जुन्नर) येथील २७ वर्षीय माजी सरपंचाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे जुन्नर तालुक्यात कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे. नारायणगांव तर्फे आर्वी येथील माजी सरपंचाना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे निदान झाले होते. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा बुधवारी (दि. १५) पहाटे मृत्यू झाला. या निधनामुळे जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. या भागात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने प्रशासनाने तालुक्यातील काही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.