Thu, Sep 24, 2020 16:54होमपेज › Pune › निमोणे येथे आजीनेही प्राण त्यागला

निमोणे येथे आजीनेही प्राण त्यागला

Published On: Dec 17 2017 2:20AM | Last Updated: Dec 17 2017 2:10AM

बुकमार्क करा

निमोणे : वार्ताहर

निमोणे (ता. शिरूर) येथे नातवाच्या मृत्यूच्या धक्क्याने  आजीनेही प्राण त्यागला.  या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शंकर ऊर्फ अरुणदादा गायकवाड (वय 31) यांचे गुरुवारी (दि. 14) मेंदूच्या पक्षघाताने निधन झाले. जन्मजात  एक पायाने  अपंग असलेल्या अरुणचे संगोपन आजी सरूबाई सखाराम गायकवाड (वय 80) यांनीच केले. अरुणच्या दुर्दैवी मृत्यूचा धक्का त्यांना सहन न झाल्याने अरुणची चिता विझण्यापूर्वीच सरूबाई यांनी देह ठेवला. अरुणने काही काळ निमोणे विविध सेवा संस्थेत लेखनिक म्हणूनही काम केले होते. अरुणच्या पश्‍चात पत्नी व दीड वर्षाची मुलगी आहे. 
या दोन्ही अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.